मुंबई :  शिवसेना भवनातल्या शिवसेनेच्या बैठकीत भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं. भाजपचे नेते आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या पुस्तिकेचं  राज्यभरात वाटप करून भाजपविरोधात वातावरण तापवण्याचे आदेश नेते आणि पदाधिका-यांना पक्षनेतृत्वानं दिल्याचं समजतंय.  या बैठकीला आदित्य ठाकरे, दिपक केसरकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई उपस्थित होते. याखेरीज पक्षाचे नेते, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखही बैठकीला उपस्थित होते.


 कर्जमाफीबाबत ग्रामीण भागात नेमकं काय वास्तव आहे याची तात्काळ माहिती देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना दिले आहेत. तसंच कर्जमाफीविषयी आंदोलन उभारण्याचे संकेतही देण्यात आलेत. 


दरम्यान, या घोटाळेबाज पुस्तिकेत एकनाथ खडसे, विनोद तावडे, गिरीश बापट, दिलीप गांधी, विष्णू सावरा, प्रविण दरेकर, जयकुमार रावळ, चंद्रशेखर बावनकुळे, रणजीत पाटील, संभाजी निलंगेकर यांच्या फोटो सह त्यांच्या घोटाळ्याचा उल्लेख आहे. तर पंकजा मुंडे यांचा फोटो तर नाहीच नाही पण ओझरता उल्लेख करण्यात आला आहे. 


पाहा कशी आहे ही पुस्तिका. संपूर्ण पाहण्यासाठी क्लिक करा...