मुंबई : Shiv Sena Crisis : Rahul Shewale on Aditya Thackeray : काँग्रेस-NCPसोबत जाणं गद्दाराची व्याख्या नाही का? गद्दार कोण आहे याचं उत्तर वरळीकर देतील, असी घणाघाती टीका बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. आदित्य ठाकरे यांना हरविण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न केला, असा आरोप यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपची साथ सोडून आदित्य ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले. गद्दार कोण आहे हे वरळी विधानसभेतील मतदार निवडणुकीत उत्तर देतील. आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत.  उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंदच आहे, पण नरेंद्र मोदी यांच्यासमोर दुसरा सक्षम पर्याय सध्या तरी दिसत नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले.


विनायक राऊत यांचे आरोप चुकीचे आहेत. लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर पद्धतीनं माझी गटनेते पदावर नियुक्ती केली आहे. शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेतला. विनायक राऊत आमचे नेते अन्याय करत होते. विनायक राऊत आणि सावंत यांनी इतर खासदारांना बोलण्याची संधी मिळायची नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.


 मुंबईविषयीही विनायक राऊतच बोलायचे. अडीच वर्ष झाले खासदारांमध्ये नाराजी होती. चीफ व्हिप भावना गवळींनी बैठक बोलावली. त्यांनीच प्रस्ताव मांडला आणि प्रताप जाधव यांनी अनुमोदन दिलं याचं व्हिडिओ शुटींगही झाले आहे. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
त्यामुळे विनायक राऊत जे बोलतायत त्यात तथ्य नाही, असे शेवाळे म्हणाले.


अध्यक्षांनीही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया केली आहे. 18 तारखेला आम्ही प्रक्रिया पूर्ण केली तर 19 तारखेला पत्रक निघाले. उपराष्ट्रपतीपदाला कोणाला पाठिंबा द्यायचा हे संजय राऊत यांचे वैयक्तिक मत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. लोकसभेतील पक्षांचे प्रमुख लोकसभा अध्यक्ष ठरवतात.  उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले आहे.  उपराष्ट्रपतीपदाला कोणाला पाठिंबा द्यायचा हे संजय राऊत यांचे वैयक्तिक मत आहे, उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.  लोकसभेतील पक्षांचे प्रमुख लोकसभा अध्यक्ष ठरवतात.  उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.