शिवसेनेचा भाजपपुढे प्रस्ताव, उद्धव-शाह भेटीत ठेवला प्रस्ताव
पाहा उद्धव-शाह भेटीत नेमकं झालं काय?
मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आलं असताना आता एक नवी बातमी समोर आली आहे आणी ती म्हणजे शिवसेना-भाजप युती संदर्भात...
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेनं भाजपपुढे एक प्रस्ताव समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत १५२ जागा आणि मुख्यमंत्री पद देण्यात यावं असा प्रस्ताव शिवसेनेनं भाजप पुढं ठेवला आहे.
शिवसेनेने ठेवलेल्या या प्रस्तावावर भाजपकडून तूर्त कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. हा प्रस्ताव मान्य असल्यास युतीबाबत पुढची बोलणी होऊ शकते.