Shivsena Politics : शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. मात्र राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध इतर खासदार असा सामना रंगला. 


या बैठकीनंतर नाराज झालेले संजय राऊत माध्यमांशी न बोलता सामना कार्यालयकडे निघून गेले. दरम्यान, आजच्या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेच्या १२ खासदारांनी  उपस्थिती लावली. तर सात खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.