मुंबई: शहरातील खड्ड्यांसाठी महापालिकेला जबाबदार धरले जात असेल तर पालिकेला त्याप्रकारचे सर्व अधिकारही मिळायला हवेत, असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबईतल्या रस्त्यांच्या कामाचे अधिकार महापालिकेकडे किंवा एखाद्या संयुक्त संस्थेकडे असले पाहिजेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि उपनगरांतून जाणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचाच विचार करायचा झाल्यास या मार्गांच्या देखभालीसाठी चार वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. या सगळ्यांमध्ये ताळमेळ राहणे, नक्कीच कठीण जाते.



त्यामुळे भविष्यात मेट्रो किंवा अन्य विकासकामांसाठी रस्ते खणताना महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक करायला हवे, असे आदित्य यांनी म्हटले. याशिवाय, सध्या शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. एका दिवसांत खड्डे बुजवले जातील असे आपण कधीही म्हणालो नसल्याचेही आदित्य यांनी सांगितले.