मुंबई : Ramdas Kadam on Guardian Minister Anil Parab : मला बदनाम करण्याचा कट आहे. अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, असे सांगत पालकमंत्री अनिल परब यांच्यावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. रामदास कदम यांना शिवसेनेतून संपविण्याचा विडा उचला आहे. रत्नागिरीत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. माझे किरीट सोमय्या यांच्याशी कोणतेही संबंध नाही. मी त्यांना कोणतीही कागदपत्रं दिलेले नाही. दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी  पक्षप्रमुखांना पत्र दिले होते. पक्षाला हानी होईल, अशी माझी कोणतीही भूमिका नाही, असे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे, असे ते म्हणाले.


बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या तीन चार महिन्यांपासून माझ्या बद्दल उलट सुलट बातम्या येत आहेत. त्याबद्दल माझा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत मी किरीट सोमय्या यांच्या सोबत बोलेलो नाही. त्यांना माहिती दिली नाही.


 अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री. त्यांचे पालक म्हणून कुठले ही काम नाही. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात प्रचंड असंतोष आहे. माझ्या विरोधात मेळाव्यात ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांचा निषेध करतो. यांच्या मागे कोण हे मला माहित आहे, असे रामदास कदम म्हणाले.


'आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परबांचे'


अनिल परब यांनी वांद्रे इथून एखाद्या वार्डातून निवडणूक लढवून दाखवावी. नगरपंचायत लढवून दाखवावी.नगरसेवक पदाची निवडणूक लढवून दाखवावी. मला राजकारणातून उध्वस्त करण्याचा डाव आहे. माझ्या मुलाला तिकीट न देण्यासाठी अनिल परब यांनी काम केले. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलाला तिकीट दिले. आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. खरं काय आहे हे शिवसैनिकांना कळाले पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले.



पक्षाची निष्ठा आता आम्हाला उदय सामंत यांच्याकडून शिकावी लागते. शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात टाकणारा अनिल परब आहे. अनिल परब गद्दार आहे. एस टी कामगारांसाठी यांना वेळ नाही, असा घणाघात यांनी रामदास कदम केला आहे.


शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत ?


ज्यांनी शिवसेना मोठी केली त्यांची हकालपट्टी करण्यात आली. अनिल परब राष्ट्रवादी नेते असल्यासारखे वागत आहेत. कडवट निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे की अनिल परब, असा आम्हाला प्रश्न पडला आहे, असे रामदास कदम म्हणाले.


अनिल परब हे राष्ट्रवादीचे नेते...


अनिल परब हे राष्ट्रवादीचे नेते असल्यासारखे वागत आहेत. कडवट निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जात आहे. अडीच वर्षांपूर्वी मी सांगितले होते, मी निवडणूक लढणार नाही. विधानपरिषद ही मागितलेली नाही. माझ्या विरोधात खोट्या बातम्या देण्यात आल्या आहेत. नवीन मुलांना मंत्री पद द्या, असे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यांनी ही ते मान्य केले. मात्र सुभाष देसाईना मंत्री पद कसे ? याबद्दल वाईट वाटले, असे रामदास कदम म्हणाले.


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत ठीक नव्हती म्हणून भेटलो नाही. त्यांनीही कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही, असे सांगत अनिल परब शिवसेनेचा मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.