मुंबई : शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी आज पुन्हा एक नवीन ट्विट केले आहे. हे ट्विट सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणार आहे. त्यांनी पुन्हा एकादा भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना-भाजप युती तुटण्याआधीही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांचा भाजपवर हा हल्लाबोल सुरुच आहे. सध्या देशात CAA आणि NRC वरुन आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. त्याचवेळी भाजपकडून समर्थनार्थ मोर्चेही काढण्यात येत आहे. या राजकीय स्थितीवरुन त्यांनी हे ट्विट केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी या ट्विटवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या एककल्ली आणि हुकूमशाही धोरणावर कडाडून टीका केली आहे. मोदी सरकारने सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (CAA) बदल केले आहेत. तसेच राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका (NRC) कायदा केला आहे. यावरुन देशात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चा काढण्यात येत आहे. याबाबत राऊत यांनी ट्विट केले आहे, तुफान में कश्तियां  और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं... या ट्विटद्वारे त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.


त्याआधी त्यांनी एक ट्विट केले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship amendment)देशभरात उग्र निदर्शने सुरु असताना शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. 'सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में| किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है', अशा ओळी राऊतांनी या ट्विटमध्ये लिहल्या आहेत. त्यांच्या या ट्विटचा रोख केंद्र सरकार राबवू पाहत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दिशेने असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, झारखंडमधील पराभवानंतर राऊत यांनी टीका केली होती. महाराष्ट्रानंतर झारखंड हे भाजपच्या हातातून निसटले आहे. आता भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा जोरदार टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.


झारखंडची सत्ता राखण्यासाठी भाजपला यश आले नाही. मोदी आणि अमित शाह यांनी मोठी ताकद लावली होती. दोघांनीही झारखंडमध्ये ठाण मांडले होते. प्रचारातून मतदारांनपुढे राष्ट्रीय मुद्दे मांडत भुलथापा देण्याचा प्रयत्नही झाला. पण देशातील जनता जागृत झालेली आहे. झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारले. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर झारखंडच्या जनतेने विश्वास दाखवल्याने झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले.