मुंबई : Sanjay Raut On Raj Thackeray's Bhonga agitation : मनसेने सुरु केलेल्या भोंग्याच्या आंदोलनावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. यासाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहण दिले आहे. रस्त्यांवर नमाज पठणासंबंधी शिवसेनाप्रमुखांनी केवळ भूमिका घेतली नाहीतर तोडगा काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नमाजपठणासाठी मशिदींना एफएसआय वाढवून दिला. त्यामुळे रस्त्यावरील नमाज बंद झाल्याचे राऊत म्हणाले. केवळ भोंगे लावून गोंगाट करुन चालत नाही तर राज्यकर्त्याला तोडगा काढावा लागतो, अशी टीका त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली.


दरम्यान, मनसेने मस्जिदीवरील भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे. त्यातच आता मनसेने नवी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावण्यात आले आहेत. परंतु, मशिदींमध्ये CCTV आहेत का, असा सवाल मनसेचे बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केलाय.