Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहाणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.


शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहण्याचं व्हिप काढलं होतं. पण ते बैठकीला आले नाहीत त्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली. त्या नोटीसीला काही जणांनी उत्तरं दिली. पण ज्यांनी उत्तर दिली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीच पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलं आहे. 


जे आमदार उपस्थित राहिले नाहीत अशा 12 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे, उर्वरित आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही अजय चौधरी यांनी केली आहे. 


या आमदारांवर कारवाईची मागणी
१ एकनाथ शिंदे
२ तानाजी सावंत
३ प्रकाश सुर्वे
४ बालाजी किणीकर
५ अनिल बाबर
६ लता सोनावणे
७ यामिनी जाधव
८ संजय शिरसाट
९ भरत गोगावले
१० संदीपान भुमरे
११ अब्दुल सत्तार
१२ महेश शिंदे 


या बारा आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे.