मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेच्या खातवाटपाची चर्चा सुरू झालीय. मंत्री आदित्य ठाकरे यांना उच्च शिक्षण, क्रीडा किंवा पर्यावरण खातं दिलं जाण्याची शक्यता सामनातून वर्तवण्यात आल्यानंतर आजच्या सामनात आणखी तीन जणांची नावं पुढं आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी खातं गुलाबराव पाटील किंवा दादा भुसेंना मिळण्याची शक्यता आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात सुभाष देसाईंसारख्या ज्येष्ठ नेत्याला कृषी खातं देण्याची योजना आहे. त्यामुळे या खात्यासाठी शिवसेनेत चढाओढ होण्याची शक्यता आहे. 


तर दुसरीकडे काँग्रेसलाही कृषी खातं हवं असल्याची दिल्लीतल्या बैठकीत करण्यात आलीय. त्यामुळे या खात्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्येही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.