मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांनी पुन्हा एकाद आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची परवानगी घेण्यात आल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. यावर आता संजय राऊत यांना शिवराळ भाषेत उत्तर दिलं आहे. 



देशाच्या राजकारणात बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यानंतर देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे चुxx लोक नाहीसे होतील, हा कोण आहे याला आम्ही ओळखत नाही असे चुXX देशात खूप आहेत अशा  शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं हा राज्याचा अमपान आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान आहे, आणि अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एखादा दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री भेटायला येतो आणि त्यांचा असा अपमान होतो हा महाराष्ट्राचा अपमान आहे म्हणून मी चुXX शब्द वापरला, असं स्पष्टीकरण सोमय्या यांनी दिलं आहे.


शिवराळ भाषेविरोधत भाजप आक्रमक
दरम्यान संजय राऊत करत असलेल्या शिवराळ भाषेविरोधात भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने आता थेट केंद्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. संजय राऊत करत असलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रीय महिला आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहे. 


चौकशी होणार असल्याचं कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले आहेत, त्यामुळ ते शिवराळ भाषेचा वापर करत आहेत, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांना आवरा असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. 


तेलंगणा मुख्यमंत्री आज मुख्यमंत्रीना भेटणार आहेत त्यावर कोणालाही भेटु दे, 2024  मध्ये आम्ही 400 पार जाणार कोणाला काही भेटुन होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


2019 लाही केंद्रीय पातळीवर अशाच पद्धतीने तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न झाला होता अनेकांनी तर मंत्रीपदाासाठी नवे कोट देखील शिवून घेतले होते पण आले शेवटी मोदीच ना. तसंच यावेळीही 2024 ला मोदी येणार, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.