राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे
Shivsena Name Symbol Row : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि शिवसेना (Shivsena) नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) यांच्या गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हे नाव निसटलं आहे.
शिंदे 40 आमदार घेऊन पडले होते बाहेर
एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. याबाबत ठाकरे गट आणि शिंदे गटाची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. या लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे.