मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळेच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. (shiv sena party chief and former cm uddhav thackeray give best wishes to new chihef minister eknath shinde)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!", असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलं.  



एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन केलं जातंय. या दोघांच्या रुपाने राज्याला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.


दरम्यान या शपथविधीनंतर आता उद्या 1 जुलैला भाजपच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडेंट इथे बैठक होणार आहे. या बैठकीला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. 


राज्य विधिमंडळाचं 2 आणि आणि  3 जुलैला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे 2 जुलैला विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या 1 जुलैला भाजपची ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय.