मुंबई : राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे (Maharashtra Political Crisis) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदेवर तोफ डागली आहे. तो शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.  ठाकरे मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं. (shiv sena party chief uddhav thackeray again critisize to cm eknath shinde)


काय म्हणाले उद्धव ठाकरे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तो शिवसैनिक नाही तर दगाबाज मुख्यमंत्री आहे. शिवसेना ही लोभापायी कुणाच्या पालख्या वाहत नाही. मंत्रीपदासाठी शिवसेना कुणाच्या ढेंग्याखालून जात नाही. शिवसेना ही भाजपापेक्षा कित्येकपटीने प्रखर हिंदुत्ववादी आहे. म्हणून त्यांना शिवसेना हवीय. मात्र ठाकरे नकोत. कारण ठाकरे बोलतात, ठाकरे झोडून काढतात. पण ठाकरेंशिवाय शिवसेना ही कदापि होवू शकणार नाही", असं उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितलं. 


"हा लढा पैसा विरुद्ध निष्ठा असा आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे की निष्ठा ही पैशाने विकत घेता येत नाही. हे सर्व चोरायला निघाले आहेत. सिंबॉल चोरत आहेत. ही मर्दांची टोळी नाही तर चोरांची टोळी आहे", अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर हल्ला चढवला.


शिवसेना कशाला चोरता? 


"तसेच मर्दांची अवलाद असाल तर स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावून निवडणूक लढा. हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा, शिवसेना कशाला चोरता?", असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.