शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई
शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई : शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरुन हटवलं आहे. शिवसेनेने याबाबतचं पत्र काढलं आहे. या कारवाईमुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (shiv sena party chief uddhav thackeray removal to reble mla eknath shinde from shiv sena leader in party organisation)
शिवसेनेत शिवसेनाप्रमुख पदानंतर नेतेपद हे दुसऱ्या क्रमांकाचं पद मानलं जातं. यावरुनच ते पद किती महत्त्वाचं हे लक्षात येतं. तसंच त्या पदाचं महत्त्व नमूदही होतं. ठाकरे यांनी याच पदावरुन एकनाथ शिंदे यांना हटवलं आहे. एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. या पत्रावर उद्धव ठाकरे यांची सही आहे.
तसंच या कारवाईच्या पत्राची प्रत ही एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या राहत्या घरीही पाठवण्यात आली आहे. याआधी शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरुनही हटवण्यात आलं होतं.
शिंदेंनी बंडखोरी करत शिवसेनेच्या गोटातील 39 आमदारांना आपल्यासोबत घेतलं. त्यानंतर सूरत, गुवाहाटी आणि गोव्याला गेले. त्यानंतर आमदारांचं समर्थन मिळवत भाजपसोबत जात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या काय बोलणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.