मुंबई : देशात सर्वाधिक श्रीमंत महापालिकेमध्ये सत्तेत असेला शिवसेना पक्ष देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरलाय. तर दुसऱ्या स्थानावर शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. आणि तिसऱ्या स्थानावर पंजाबमधील शिरोमणी अकाली दल आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली. या माहितीच्या आधारावर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) हा अहवाल तयार केला आहे. शिवसेनेला तब्बल २५.६५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला ३ हजार ८६५ देणगीदारांकडून २४.७५ कोटी रुपयांची देणग्या मिळाल्या आहेत. सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्षांच्या यादीत पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाला १५.४५ कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे.


दरम्यान, शिवसेना सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला असला तरी, २०१५-२०१६ च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत ७० टक्क्यांची घट झाली आहे. २०१५-२०१६ मध्ये शिवसेनेला ६१.१९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे आसाम गण परिषद आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोन पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. आसाम गण परिषदेला २०१६-२०१७ मध्ये ०.४३ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल ७ हजार १८३ पट इतकी आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला ४.२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. २०१५-२०१६च्या तुलनेत ही वाढ ५९६ पट इतकी आहे.