मुंबई - शहरात धकाकधकीच्या जीवनमानामुळे नागरिकांमध्ये जीवनशैलेशी निगडीत आजारांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तकदाब, हृदयविकार तसेच नैराश्य यासारख्या आजारांचा समावेश होतो. या जीवनशैलीशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय सल्यामानुसार आरोग्यदायी जीवनशैली व योगासनांचा प्रचार व प्रसार झाल्या‍स त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेत शिवसेना महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये येत्या जून २०२२ पासून शिव योग केंद्रे सुरु करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिव योग केंद्रा बाबतील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे 


1) बृ‍हन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी 'शिव योग केंद्र' हा महत्वाकांक्षी उपक्रम सर्व विभागात सुरू करण्यात येत आहे. 


2) इच्छुक नागरिकांच्या  समुहासाठी ज्यामध्ये ३० नागरिकांची माहिती एका समुह (गट) म्हणून सादर करणे अपेक्षित आहे. या सोबतच ज्या समुहाकडे शिवयोगा केंद्रासाठी खुली जागा, सभागृह, समाज मंदीर हॉल इत्यादींची सोय असल्यास ती ठळकपणे नमूद केल्यास अशा समुहास प्राधान्य असेल. सदर योग प्रशिक्षणासाठी नागरिकांनी सुयोग्य जागा सुचविलेली नसल्यास सदर जागा मोफत उपलब्ध होण्यारकरिता समन्वय करणे अथवा उद्यानातील मोकळी जागा, मैदान, शाळेचा हॉल अथवा समाज कल्याण केंद्र इत्यादी असे ठिकाण उपलब्ध करून देणे.


3) शिव योग केंद्राची पूर्वतयारी, अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत स्वारस्य अभिव्यक्तीद्वारे अर्ज मागवून नामांकित व नोंदणीकृत योग प्रशिक्षण संस्थेची निवड करणे, निवड झालेल्या योग प्रशिक्षण संस्थेबरोबर सामंजस्य करार करणे, विभागवार प्राप्त झालेली इच्छुक नागरिकांची माहिती संकलित करून निवड झालेल्या योग प्रशिक्षण संस्थेला देणे, वेळोवेळी शिव योगा केंद्राचा आढावा घेणे व कामगिरीनुसार शिव योगा केंद्र बंद किवा सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणे, इत्यादी जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. 


4) ज्या योग प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल, त्या संस्थेला सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत देण्यात आलेल्या महितीनुसार विभागवार योग केंद्रावर प्रशिक्षित व अनुभवी योग प्रशिक्षकाची नेमणूक करणे, 'शिव योग केंद्र' सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातून ५ दिवस योग प्रशिक्षक उपस्थित राहील याची खबरदारी घेणे, योग प्रशिक्षक सभासदांना 'common yoga protocol' प्रमाणे योग प्रशिक्षण देतील याची खबरदारी घेणे, निर्धारित ९० दिवसांच्या कालावधीमध्ये सभासद उत्तमप्रकारे प्रशिक्षित होऊन 'स्वयं योग' करू शकतील अशा प्रकारे प्रशिक्षण देणे, इत्यादी बाबी करणे संबंधित संस्थेला आवश्यक असणार आहे. 


5) संस्थेद्वारे नेमण्यात येणा-या योग प्रशिक्षकाला नेमून दिलेल्या शिव योगा केंद्रावर नियमित व वेळेवर उपस्थित राहणे, सभासदांना 'common yoga protocol' प्रमाणे योग प्रशिक्षण देणे, शिव योग केंद्रातील उपस्थिती पटावर स्वाक्षरी करणे, योग प्रशिक्षण देताना सहव्याधी असलेल्या नागरिकांना त्यांच्या योग्यतेनुसार व आवश्यकतेनुसार योग प्रशिक्षण देणे.


6) किमान ३० नागरिकांच्या गटासाठी एक 'शिव योग केंद्र' सुरू करण्यात येईल, एका गटाचा योग प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा असेल व प्रशिक्षणाचा कालावधी प्रति‍दिन १ तासाचा असेल. शिव योग केंद्र सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातून ५ दिवस सकाळी ०६.०० ते ०८.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील.  


7) प्रत्येक बॅचचा प्रशिक्षणचा कालावधी संपल्यावर ५० सत्र उपस्थित असलेल्या सभासदांना प्रमाणपत्र देण्यात येईल.


8) शिव योगा केंद्र उद्यान अथवा मोकळ्या जागेवर कार्यरत असल्यास पावसाळ्यात नवीन ठिकाण उपलब्ध करण्याबाबत प्रयत्ना केला जाईल, अशी व त्याबाबत व्यवस्था न झाल्यास काही कालावधी साठी सदर केंद्र बंद ठेवण्यात येईल.