मुंबई :  राजकीय वर्तुळातून (Maharashtra Poltics) मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. निलम गोऱ्हे पण शिंदे गटात प्रवेश करतायेत की काय, अशी चर्चा रंगू लागलीय. मात्र गोऱ्हे यांनी या भेटीबाबत झी 24 तासला प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. (shiv sena uddhav balasaheb thackeray leader neelam gore meet cm eknath shinde)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलम गोऱ्हे-मुख्यमंत्र्यांची भेट हॉटेल ट्रायडंटमध्ये झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं ही चर्चा झाल्यांच म्हटलं जातंय. या भेटीनंतर नीलम गोऱ्हे सह्याद्री गेस्ट हाऊसवर आल्या. नीलम गोऱ्हे ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. 



निलम गोऱ्हे भेटीबाबत काय म्हणाल्या?  


तर  ही राजकीय भेट नव्हती आपण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेण्यासाठी गेलो होतो असा दवा नीलम गो-हे यांनी केलाय. या बैठकीत विधानसभा सभापती राहुल नार्वेकर उपस्थित असल्याचंही गोऱ्हे यांनी सांगितलं.