Shiv Sena : शिवसेनेला मोठा धक्का, 15 नगरसवेक शिंदे गटात
एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे.
ठाणे : एकनाश शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे. सर्वात प्रथम नाराज आमदार एकनाथ शिंदेसह एकत्र आले. त्यांनतर भाजपसह सत्तास्थापन केली. सत्तास्थापनेनंतर आणखी काही आमदारांनी आपली भूमिका बदलत शिंदे गटात जाण्यात धन्यता मानली. यानंतर विविध महापालिकेतील नगरसेवकही शिंदे गटात दाखल झाले. आता आणखी काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पसंती दर्शवत शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. (shiv sena ulhasnagar municipal corporation 15 corporators has join rebel eknath shinde group)
ठाणे आणि नवी मुंबईपाठोपाठ आता उल्हासनगर महापालिकेतल्या नगरसेवकांनीही उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. उल्हासनगरचे शिवसेनेतील 15 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या 15 नगरसवेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
विशेष म्हणजे या सर्व दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आणखी एक धक्का देणार दावा केला. नाशिक, दिंडोरी आणि नगरचेही नगरसेवक भेटायला आल्याचा दावा मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी केला. त्यामुळे शिंदे यांनी केलेला दावा खरा ठरणार की खोटा हे लवकरच स्पष्ट होईल.