मुंबई : राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे. आता हळूहळू शिंदे समर्थकांची गर्दी होत आहे. काही ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन होत आहे. तोडफोड केली जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे समर्थक रस्त्यावर उतरुन पाठिंबा दर्शवत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सत्तासंघर्ष नवं काय वळणं घेतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. शिवसैनिकांकडून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 


उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं ऑफिस फोडलं आहे. कल्याण मतदार संघाचे खासदार आणि एकनाथ शिंदेंचं पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. उद्धव ठाकरे समर्थकांनी उल्हासनगर गोल मैदान परिसरातील कार्यालयाची तोडफोड केली आहे. 


एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानं उद्धव ठाकरे समर्थक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसत आहे. यामुळे वातावरण आणखी तापू नये म्हणून मुंबईसह ठाण्यात पोलिसांनी सुरक्षेच्या कारणामुळे 144 कलम लागू केलं आहे.