वरुण सरदेसाई अडचणीत? दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेना- युवासेनेमध्ये जोरदार खडाजंगी
शिवसैनिकांचा युवासेनेच्या कार्यपद्धतीवर रोष
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची सोमवारी शिवसेना भवनात दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी महत्वाची बैठक झाली. यावेळी शिवसेना (Shivsena) आणि युवासेनेमध्ये (yuvasena) जोरदार खडाजंगी पाहायला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत (vinayak raut), अनिल देसाई (anil desai) आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई (varun sardesai) आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण (suraj chavan) उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम (siddhesh ramdas kadam) अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसे? असा प्रश्न विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. (Shivsena Yuvasena clashed before Dussehra meeting)
याबाबत शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला. यावर युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून याबाबत लवकर निर्णय घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले.
सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम शिंदे गटात असून ते दररोज ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. अशा वेळी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत कसे, त्यांची हाकालपट्टी अजून का केली नाही? असे प्रश्न विभाग प्रमुखांनी विचारत युवासेनेच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला आहे.