मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केलाय. दरम्यान, शिक्षक मतदार संघ निवडणुकीतही शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरलेय. भाजपच्या घोषणेआधीच शिवसेनेच्या उमेदवारी घोषणा करण्यात आलेय. त्यामुळे भाजप आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केलेय. शेंडगे चारकोप येथील एकविरा विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये गेली १८ वर्षे कार्यरत आहेत. २०१५ मध्ये शेंडगे यांच्या पॅनलने माध्यमिक शिक्षक कर्मचारी पगारदार पतसंस्था निवडणूक लढवली होती.सर्वाधिक मतांनी त्यांचे पॅनल विजयी झालेय. त्यांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांच्या पॅनेलचा केला पराभव केला होता.


दरम्यान, पालघर लोकसभा पोट निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने पोटनिवडणुकीत उडी घेतली. तर ही जागा भाजपची होती. मात्र, शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देऊन भाजपला शह दिलाय. त्यानंतर भाजपच्या आधी मुंबई शिक्षक मतदार संघात उमेदवार जाहीर करुन भाजपला शह दिलाय. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील दुरावा आणखी वाढल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला मदत न करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. त्यामुळे सेना आणि भाजपमधील संर्घष शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.