शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता, मर्यादा शिथिल केल्याने हजारो शिवसैनिकांना प्रवेश
Shiv Sena Dussehra Melawa : दसऱ्याच्या दिवशी सर्वाधिक उत्सुकता असते ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. (Dussehra Melawa) शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात होत आहे.
मुंबई : Shiv Sena Dussehra Melawa : दसऱ्याच्या दिवशी सर्वाधिक उत्सुकता असते ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. (Dussehra Melawa) शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. (Shiv Sena's Dussehra Melawa in Mumbai) तर उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.
मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा आता हा हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सोहळा होईल. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याचीच जास्त उत्सुकता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नाराळ फोडणार का?, शिवसेनेच्या टार्गेटवर कोण असणार असेल, हिंदुत्व, महाविकास आघाडी, केंद्रांतील प्रमुख संस्थांकडून टाकणात येणाऱ्या धाड, छापेमारी यावर ते भाष्य करणार का, याची उत्सुकता आहे.
आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने शिवसैनिकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. दोन डोस घेतलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना प्रवेश मिळणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा होणार्या षण्मुखानंद सभागृहाची बसण्याची मर्यादा तीन हजारच्या आसपास आहे. 8 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने बंदिस्त सभागृहात 200 पेक्षा जास्त लोकांना प्रवेश देता येणार नाही ही मर्यादा काढून टाकली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला होता. आता मात्र, कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये हा मेळावा न घेता षण्मुखानंद सभागृह होत आहे. या सभागृहात हजारो शिवसैनिकांना प्रवेश मिळणार असल्याने आता मेळाव्यात जोश दिणार आहे.