मुंबई : शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाईने उत्तर देईल, असा इशारा देण्यासाठी आज शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चाचं आयोजन केले आहे. या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनी कार्यालयांवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉटजवळून सकाळी ११ वाजता  मोर्चाला सुरुवात होईल. मुंबईतील मोर्चा हा प्रातिनिधीक मोर्चा असून राज्यभरातील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये शिवसेनेची शिष्टमंडळे जाणार आहेत. 


शेतकऱ्यांच्या रक्तातून, घामातून, त्यागातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्या शेतकऱ्यांसाठी मुंबईत मोर्चा निघत आहे. शेतकऱ्यांची ‘कर्जमाफी’ची घोषणा झाली. पण तेथेही बँकांचे नियम–कानून झक मारीत आहेत. पीक विमा योजनांवर विमा कंपन्यांच्या मस्तवाल बोंडआळया बसल्या आहेत. आदी प्रश्नांना वाचा फोडून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना मुंबईच्या रस्त्यावर उतरत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे