मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले
महानगरपालिकेत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपपेक्षा शिवसेनेची संख्या जास्त होण्यास मदत मिळाली आहे. सेनेची संख्या आता ८५ वर पोहोचली आहे.
मुंबई : महानगरपालिकेत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपपेक्षा शिवसेनेची संख्या जास्त होण्यास मदत मिळाली आहे. सेनेची संख्या आता ८५ वर पोहोचली आहे.
जोगेश्वरीचे अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे नगरसेवकपद रद्द केल्याची घोषणा महापौरांनी पालिका सभागृहात केली. चंगेज मुलतानी यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे.
या प्रभागात चंगेज मुलतानींच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मतं, ही राजू पेडणेकर या शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती. त्यामुळे आता राजू पेडणेकर यांना नगरसेवकपद दिले जाणार आहे. यामुळे पालिकेत सेनेचं संख्याबळ ८४ वरुन ८५ वर पोहोचणार आहे.