मुंबई : एसटी महामंडळाची शिवशाही ही वातानुकीत बस सध्या सुपरहिट चाललीय. मात्र नुकताच एका शिवशाही बसला अपघात झाला. त्यात एका प्रवाशाला आपला हात गमवावा लागला. ही सेवा एसटीतर्फे चालवली जात असली तरी बसेस मात्र कंत्राटदारांच्या आहेत. ९ मे या दिवशी बोरिवली कराड या शिवशाही बसला कराडजवळ अपघात झाला. चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले. मात्र मिरारोडच्या जीवन ढगे यांना अपघातात हात गमवावा लागला. बसचालक चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असल्याचं त्यांनी वेळीच लक्षात आणून दिलं होतं. मात्र त्यांचं न ऐकल्याने व्हायचे ते परिणाम झाले. बस पलटली आणि प्रवासी जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून २०१७ मध्ये शिवशाही बस सुरू झाली. त्यानंतर बीड आणि कराड इथे या बसेसना अपघात झाले. एसटीकडून ढगे यांना मदत केली जाणार आहे. तसंच अपघात झाल्यावर अपघातस्थळावरून पळ काढणाऱ्या चालक आणि वाहकावरही कारवाई होणार आहे. सध्या अनेक मार्गावर शिवशाहीला मागणी आहे. खासगी वाहतुकीकडे वळलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळवण्यासाठी ही सेवा उपयोगाची आहे... मात्र असे अपघात झाले तर शिवशाहीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण होतील. त्यामुळे शिवशाही प्रवास सुरक्षित करण्यावर भर देणं गरजेचं आहे. त्यासाठी कंत्राटदार, बसचालक यांच्यावर एसटीचा अंकुश हवाच.