मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या संबंध बिघडले आहेत. नुकताच अमित शाहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास 2 तास बंद दरवाज्यामागे दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अनेकांना उत्सूकता होती. विधानसभा निवडणुकीत युती झाली तर शिवसेनेला 152 जागा हव्या आहेत. शिवसेनेचं म्हणणं आहे की, 288 पैकी त्यांना 152 जागा हव्या आहेत तर बाकीच्या 136 जागांवर भाजपने लढावं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला जास्तीत जास्त जागांवर रोखण्यासाठी आणि स्वत:चा मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेला हवं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेनेचा या फॉर्म्युला स्वत:चा मुख्यमंत्री व्हावा म्हणून आहे. पण भाजप शिवसेनेला इतक्या जागा देईल असं वाटत नाही. भाजप तयारी झाली तर समान जागा लढण्यावर तयार होऊ शकते.


2014 चा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला 2019 मध्ये पुन्हा अस्तीत्वात येऊ शकतो. पण लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढेस असं वाटत नाही. लोकसभेतील भाजपचं यश पाहिल्यानंतर ही शिवसेना पुढचा निर्णय घेऊ शकते, लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या नाही तर शिवसेना एकटी निवडणूक लढवू शकते.