COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव तसंच  पक्षाचे नवनियुक्त सचिव मिलिंद नार्वेकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषदेच्या  रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक होतेय. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार शिवसेनेचे 2 आमदार सहज निवडून येऊ शकतात. पहिल्या जागेसाठी आमदारकीची मुदत संपत असलेले अॅड. अनिल परब यांचे नाव निश्चित आहे.  उमेदवार जिंकण्यासाठी 25 मतांचा कोटा असतो शिवसेनेकडे पक्षाची अधिकृत 63 मते. त्यामुळे आणखी एक आमदार अगदी सहज निवडणून येऊ शकतो. आणि याच जागेसाठी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


पक्षात मोठा वाद ?


नार्वेकर 23 वर्षे उद्धव यांचे स्वीय सचिव आहेत. शिवसेनेत अत्यंत वादग्रस्त म्हणून नार्वेकरांचं  व्यक्तीमत्व  म्हणून प्रसिद्ध आहे. मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यास पक्षात मोठा वाद होण्याचीही चिन्ह आहेत. नार्वेकर यांच्या नावाला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तीला संधी देऊन उद्धव ठाकरे देऊ शकतात सर्वानाच धक्का देतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.