मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)t  यांना ईडीने (ED) अटक केली. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याची प्रतिक्रिया ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात येत आहे. या अटकेवरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विविध स्तरातून याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या अटकेवरुन शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि भाजपला नेहमीच फैलावर घेणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (shivsena leader and mp sanjay raut give reaction on ed arrested to ncp senior leader and cabinet minister nawab malik at mumbai) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत काय म्हणाले?


"एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला अनपेक्षितपणे केंद्रीय तपास यंत्रणेने सुडबुद्धीने कारवाई केली असेल, तर त्या संदर्भात संपूर्ण मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार भेटणार असतील तर त्यात चुकीचं काय?, असं संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊतांनी सामनाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान ते बोलत होते. 


"मी पाहून घेईन"


या संपूर्ण प्रकरणा संबंधात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का, असा सवाल राऊतांना विचारण्यात आला. "यावर मी पाहून घेईन. आधी मंत्रिमंडळाची बैठक होईल", अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.