कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: शिवसेना नेते अनिल परब यांनी वांद्र्यात म्हाडाची जागा बळकावून कार्यालय उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या यांनी म्हटले की, मी आज अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयाला भेट दिली. म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत त्यांनी कार्यालय थाटले आहे. विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. २७ जून २०१९ रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मग सरकार अनिल परब यांना वेगळा न्याय का लावत आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्या कंपनीसाठी जागा बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ही जागा समाजकल्याण केंद्र आणि झोडपट्टी पुनवर्सन यंत्रणेची SRA आहे. SRA ने देखील ही बाब मान्य केली आहे. महापौरांच्या या कार्यालयाच्या पत्त्यावर आणखी आठ कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांविरोधात आपण सक्तवसुली संचलनालयाकडे ED तक्रार करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.


'अँटिबॉडीज चाचण्या खाजगी लॅबद्वारे करून २७० कोटी रूपयांची लूट'
आरटीपीसीआर आणि अँटिबॉडीज चाचण्या खाजगी लॅबद्वारे करून २७० कोटी रूपयांची लूट करण्यात आली. ७९६ रूपये दराने हिंदुस्थान लेटेक्स या सरकारी कंपनी चाचणी तयार करायला असताना खाजगी लॅबधारकांना १९०० ते २२०० रूपये चाचणीसाठी दिले गेले. खासगी लॅबधारकांकडून कमिशन मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. थायरोकेयर, मेट्रोपोलिस, इन्फेक्शन लॅब, एसआरएल लॅब आणि सबअर्बन लॅब या खासगी लॅब्सना चाचण्यांचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.