मुंबई : शिवसेनेत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाई यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध आहे. काही नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून देसाईंच्या नावाला विरोध असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे पुन्हा विधानपरिषदेतल्या आमदारांना मंत्रिपद द्यायला विधानसभेतल्या आमदारांचा विरोध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेतील धुसफूस वाढली आहे. त्यामुळे ही नाराजी कशी दूर करायची हा शिवसेनेपुढे पेच आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद द्यायलाही शिवसेनेचा विरोध आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे.


ठळक मुद्दे :


- शिवसेनेत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच
- उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाईंच्या नावाला काही नेत्यांचा विरोध
- उद्धव ठाकरेंना भेटून काही नेत्यांनी देसाईंच्या नावाला केला विरोध 
- दुसरीकडं पुन्हा विधानपरिषदेतील आमदारांना मंत्रीपद देण्यास विधानसभेतील आमदारांचा विरोध
- राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यास विरोध
-  मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेतील धुसफूस वाढली
- उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार ?