Farmers Protest : संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार
संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज सिंघू सीमेवर (Singhu Border) जाणार आहेत. तिथे जाऊन ते आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून राऊत सिंघू सीमेवर जाणार असल्याचे सांगण्यात येतंय. संजय राऊत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिलीय.
महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम ऊभे राहीले आहेत असे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज सिंधु सीमेवरील आंदोलक शेतकर्यांना भेटत असल्याचे ते ट्वीट करुन म्हणाले.
बजेटवरुन टीका
सरकारने बजेटमध्ये थापा मारू नयेत असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय. देशाची अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र त्यातही मुंबईच्या महसूलावर उभी मात्र महाराष्ट्राला काहीच नाही असेही ते म्हणालेयत. कायम अन्याय होतो. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र दिसतच नाही असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र देशाचं पोट आहे पण या पोटाकडे कोणी पाहात नाही. फक्त दोनच शहरांना मेट्रोचं गुळ फासलं. हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट असेल तर ते देशाचं नव्हे तर एका राजकीय पक्षाचं बजेट आहे. त्यांना पेट्रोल बहुतेक 1000 रुपये लीटर करायचंय,
'पेट्रोलमुळे घरातच बसावं कायमचं असं त्यांना वाटतंय असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला.