शिवसेनेची दुपारी 12.30 वाजता आमदारांसोबत बैठक
काय असेल शिवसेनेची रणनीती?
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण मिळाल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या गोटात हालचाली पाहायला मिळाल्या. दुपारी 11 वाजता 'वर्षा' बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून शिवसेनेची दुपारी 12.30 वाजता हॉटेल रिट्रिटवर आमदारांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मढ येथील हॉटेल रिट्रीटवर शिवसेना नेत्यांना ठेवण्यात आलं. यामध्ये मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर आणि अनिल देसाई उपस्थित असून, गजानन किर्तीकर, रामदास कदम यांचा समावेश आहे. आमदार फुटण्याच्या भीतीने शिवसेनेच्या आमदारांना मढ बीचवर हलवण्यात आले होते. या आमदारांना बीचवर आनंद लुटताना पाहण्यात आलं. आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटील मढच्या बीचवर सेल्फी घेण्यात मग्न होते. मढला रवाना करण्यापूर्वी सेनेचे आमदार मुंबईतील रंगशारदा हॉटेलवर वास्तव्यास होते. मात्र सत्तासंघर्ष शिगेला पोहचताच सेनेनं आपल्या आमदारांना मढ बीचवर पाठवून दिलं आहे. (तिढा सुटणार का? भाजपच्या कोअर कमिटीची 11 वाजता बैठक)
दरम्यान उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याबाबत, पुढचं पाऊल टाकण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यपालांना भेटण्यापूर्वी भाजपकडे तीन पर्याय आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पुढे शिवसेनेसोबत चर्चा करण्याचा पर्याय भाजपकडे आहे. राज्यपालांना भेटण्यापूर्वी भाजप आणि शिवसेना आपली रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक घेत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.