मुंबई : शिवसेनेचे नाराज आमदार तुकाराम काते भाजपच्या गळाला लागणार असल्याची शक्यता आहे. चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्र्यांचं मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत केलं. फडणवीस सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काते यांच्या मतदारसंघात ईस्टर्न फ्री वे बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डींग्ज काते यांनी मतदारसंघात लावले होते. पण आपण शिवसेनेत नाराज असलो तरी शिवसेना सोडणार नसल्याचं काते यांनी म्हटलंय.


शिवसेनेच्या नाराजांना गळाला लावण्याची भाजपची व्यूहरचना आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या नाराजांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं मार्गी लावत आहेत. त्यामुळे शिवसेना आमदार खुश आहेत तर पक्षाच्या मंत्र्यांवर मात्र नाराज आहेत.