मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराने देखील CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यानंतर आता आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी देखील मागणी ही मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. भाजपच्या नेत्यांशी चर्चा करुन लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे.


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri byelection) एकूण 14 आमदार रिंगणात आहे. पण खरी लढत ही ठाकरे गट आणि भाजपमध्ये असणार आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरुद्ध भाजपच्या मुरजी पटेल (Murji Patel) यांचं आव्हान आहे.


दुसरीकडे भाजपची आज रात्री महत्त्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे. भाजपनं अंधेरी पोटनिवडणूक लढू नये, असं पत्र राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलंय. त्यानंतर ही बैठक होतेय. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे या बैठकीत भाजप काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलंय.