`मुख्य`चे `उप` झाल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सामनातून फडणवीसांवर जोरदार टीका
Devendra Fadnvis: सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखातून काय टीका करण्यात आलीय पाहूया. तसेच फडणवीसांना `सांभाळा` असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Samana on Devendra Fadanvis: सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखातून काय टीका करण्यात आलीय पाहूया. तसेच फडणवीसांना 'सांभाळा' असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
आपले मुख्यमंत्री सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. "मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच," असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था असल्याची टीका करण्यात आली आहे.
फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना 'उप' म्हणून पुन्हा पाठवले. आज हे 'उप' एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.
2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस आणि त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नाही. भाजपच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी बेइमानी केली असेही यावेळी सांगण्यात आले. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला आणि फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता असा टोला फडणवीसांना लगावण्यात आला आहे.
राज्यभर आंदोलन
फडणवीसांवरील टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सामना विरोधात तक्रार करून राज्यभर आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. तर बावनकुळेंना का मिरच्या झोंबल्या असा सवाल राऊतांनी विचारला.