मुंबई : राजकीय विरोधकांचा एकेरी उल्लेख करुन चिखलफेक करणे तसेच मनुष्यवधाचा गुन्हा असणाऱ्या व्यक्तीसाठी आंदोलन करणे यातून अराजकतेकडे जाण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजप नेते आणि समर्थकांकडून एकेरी उल्लेख झाला. नेते आदित्य ठाकरेंवर राजकीय चिखलफेक करण्यात आली. दरम्यान अर्णब गोस्वामींच्या समर्थनाथ भाजप रस्त्यावर उतरला हे जगातील आठव आश्चर्य असल्याची टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या कारभाराची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना आपला पराभव समोर दिसू लागलाय.  तरीही तद्दन खोट्या बातम्या पसरवून ते आपल्या पदाची नाचक्की करत आहेत. मतमोजणी थांबवण्याचा कांगवा ते करतात तर कधी न्यायालयात जाऊन निर्णयास स्थगिती आणतात. ट्रम्प यांच्या 'रिपब्लिकन' समर्थकांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ आणि हिंसाचार केलाय. हे वर्तन अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रतिमेस धरुन नाही. तसेच वर्तन महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून होत असल्याचे सामनातून म्हटलंय. 



गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या  कारवाया सुडाच्या होत्या असं त्यांनी वारंवार म्हटलंय पण तेव्हा भाजपने रस्त्यावर उतरुन कधी आंदोलन केली नाहीत. किंवा कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही अशी आठवण सामनाच्या अग्रलेखातून करुन देण्यात आली आहे.