आताची मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक
महाराष्ट्रात पुन्हा ईडीची लाट, संजय राऊत यांचे हे निकटवर्तीय अडचणीत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
१ हजार 34 कोटींचा हा घोटाळा असून प्रवीण राऊत हे HDIL कंपनीशी संबंधित आहेत. याप्रकरणी ईडीने सखोल चौकशी केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. आज प्रवीण राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतल्या गोरेगावमध्ये पत्राचाळीचं रिडेव्हलपमेंट केलं जाणार होतं. पण ती प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंट न करता गृह आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ती जमीन नऊ वेगवेगळ्या डेव्हलपर्सना विकली. त्यातून त्यांनी तब्बल 1 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवली.
प्रवीण राऊत हे गृह आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत एक डिरेक्टर आहेत. यामुळे प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांचं नाव याआधी पीएमसी स्कॅममध्येही होतं.
आता जमीन घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत आणि त्यांच्या कुटुंबाचीही चौकशी होऊ शकते.