Sanjay Raut ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
Sanjay Raut News Update : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 तारखेला रात्री उशीरा अटक केली होती. यानंतर 1 ऑगस्टला संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी. ईडीकडून 8 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायाधीश एम. जी.देशपांडे यांनी एवढ्या कोठडीची गरज नसल्याचे म्हणत 4 ऑगस्टपर्यंतच ईडी कोठडी सुनावणी होती.
त्यांची ईडी कोठडी आज संपली. त्यानंतर आज त्यांना पुन्हा विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आलं. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने 10 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवून मागितली होती. काही जणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.
तर हे सर्व राजकीय आकसापोटी सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांचे वकिल अॅड. मनोज मोहिते यांनी कोर्टात केला. कस्टडी वाढवण्याची गरज नाही, चौकशी कस्टडीशिवायही करता येते असा युक्तीवाद अॅड. मनोज मोहिते यांनी कोर्टात केला.
मुंबईत दोन ठिकाणी छापे
संजय राऊत यांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं मुंबईत दोन ठिकाणी छापे मारलेत. या छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. संजय राऊत यांनी अलिबागमधील 10 फ्लॅट्स खरेदीसाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
एचडीआयएलच्या माजी अकाउंटंटचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. राऊतांच्या खात्यात ट्रान्सफर झालेल्या पैशांव्यतिरिक्त प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली होती. हा पैसा अलिबाग आणि मुंबई ईडीमधील फ्लॅट खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.