मुंबई : कांजूरमार्गावरील मेट्रो कारशेडची जागा केंद्राची असल्याचा दावा केल्यानंतर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने सामने आले आहेत. आरेमधील मेट्रो कारशेडला राज्य सरकारने स्थगिती देत कांजूरमार्गामध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र या जागेवर आता केंद्र सरकारने दावा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता या वादावर राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून आपला संताप देखील व्यक्त केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की,'महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र!!


नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, असं स्प्ष्ट केलं आहे. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी ट्विट करत मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार असल्याचं म्हटलंय. कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील कारशेडचे काम थांबविण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला पत्राद्वारे केली होती.