Shrikant Shinde Interview: राज्य सरकार आणि संसदेत युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी युवा धोरण कसं काम करतं याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले. झी 24 तासच्या 'महाराष्ट्र एक पाऊल पुढे' कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र कसा पुढे जातोय हे मागच्या दोन वर्षात आपण पाहतोय. आम्हाला कधी निवडणुकांच्या टेन्शनमुळे आजारपण येत नाही. मराठवाडा, जळगाव, नंदुरबार असे दौरे मी करतोय. सतत काम ही आमची ओळख आहे. अगोदर फक्त फेसबुकवरुन काम व्हायचं. आम्ही फेस टू फेस काम करतो. अशावेळी आजारपण आलं तरी आम्ही मागे हटत नाही असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 


विकास हाच आमचा अजेंडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चाललोय. फेक नरेटिव्ह मुद्दा हरियाणात चालला नाही. तिसऱ्यांदा तेथे सरकार स्थापन झालं. विकास हाच आमचा अजेंडा आहे. कितीही टिका झाली तरी मुख्यमंत्री त्याला उत्तर देण्यासाठी ताकद वाया घालवत नाहीत. मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आहेत. इन्फ्रा, स्टार्टअप, एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर एकवर आहे. राज्य इंडस्ट्री फ्रेण्डली आहे. देशातील सर्वात मोठी मेट्रो मुंबईत आहे. 2 वर्षांमध्ये कोस्टल रोड पाहिला. संभाजी नगर, नागपूर, अकोला मुंबईच्या जवळ आले. महाराष्ट्रातदेखील विकासाचे मॉडेलच स्वीकारतील. त्यालाच मतदान करतील, असे ते म्हणाले. 


महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यांमध्ये जातायत?


महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या बाबतीत गुजरातला मागे टाकलंय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुतवणूक येतेय.दाओस असतो इंडस्ट्री क्षेत्रासाठी असतो तिथे आधी पर्यावरण क्षेत्रातील लोकंही जायचे. मुख्यमंत्री दोन दिवस तिथे गेले आणि हजारो कोटींचे प्रोजेक्ट घेऊन आले. अडीच वर्षात बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, मेट्रो अशा सर्व गोष्टी मी लोकांना फेस टू फेस भेटतो. त्यामुळे लोकांच्या भावना कळतात, असेही ते म्हणाले. 


युवकांना फुकट पैसे देताय का?


विरोधकांनी अडीच वर्षे काही दिलं नाही. त्यामुळे फुकट देतोय असं त्यांनाच वाटतं. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. महिलांना स्वत:चे उद्योग कसे उभारले जातील हे पाहतोय. बचत गटाचा फायदा महिलांना पोहोचतोय. 1500 रुपये छोट्या मोठ्या उद्योगात वापरु शकतो. हे पेसे अर्थव्यवस्थेतच येणार आहेत. शाळेची फी, आजारपण यासाठी पैसे वापरता येतात. महिलांनी स्टॉल्स, हातगाडी घेतलीय. ही योजना आज यशस्वी झाली आहे. बेरोजगारी वाढतेय अशी टीका विरोधक नेहमी करत असतात. आम्ही योजना आणल्या. कोणत्याही कामासाठी अनुभव आवश्यक असतो. युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आम्ही 6,8,10 हजार रुपये देतोय. अनुभव मिळाल्यावर कंपनीत नोकरीही मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


भूमीपुत्रांसाठी योजना 


अनुभव आणि कोशल्य नसतं म्हणून भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळताना अडचणी मिळतात. म्हणून आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलीय. कंपन्यांना कशा कौशल्याची गरज आहे हे ओळखून तिथल्या स्थानिक योजनांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षण घेत असताना तिथे तरुणांना स्टायपेंडदेखील मिळणार आहे. 


रिंग रोडमुळे प्रवास सुखकर


लोकांना लोकलशिवाय पर्याय नव्हता. पण वेगवेगळे पर्याय आपण उपलब्ध करुन देतोय.सर्वात मेट्रोचं जाळ मुंबई एमएमआर रिजनमध्ये आहे. चांगल काम करताना खोडा टाकण्याचं काम काही लोकं करतात. कारशेड पूर्ण करण्यासाठी १० हजार कोटी जास्त लागले. 
कोस्टल रोड आपण विरारपर्यंत नेतोय. ठाणे-बोरीवली टनल रोड पूर्ण होतोय. मुंबई, एमएमआरसाठी एक रिंग रोड तयार होतोय. 


मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस परत येईल का?


मुंबईतील मराठी माणूस बाहेर गेला कारण त्यांची घर त्यांना मिळाली नाही. पुनर्निमाण अडकलं. लाखो लोकांना घर नाहीत, काही ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहतायत. आम्हाला घर मिळेल या आशेने दोन- पिढ्या तिथे राहतायत. आम्ही एसआरएसोबत एमएमआरडीएला जोडलं. आता लोकांना सरकार घरे बांधून देईल. रमाबाई नगरला याचा फायदा झाला आहे. रखडलेले प्रकल्प हाती घेऊन सरकार हक्काचे घर बांधून देणार आहोत. आम्ही स्वप्न दाखवत नाहीत तर ती पूर्ण करतो. मुंबईतून बाहेर गेलेलं कुटुंब आम्ही त्याच्या हक्काच्या घरात राहतील, असे श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. लोकांना काम दिसलं पाहिजे. मतदार कामावर तुम्हाला मत देतात. रोज येऊन काही ना काही बोलँण, नको ते बोलणं यामुळे तरुण कंटाळलेयत. पण तरुणांना राजकारणात येण्याची संधी आम्ही देतोय, असेही ते म्हणाले.