मुंबई : मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदार ashish shelar आशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले आहेत. भाजप नेते राज पुरोहीत यांच्या कार्यालयासमोरही आशिष शेलार यांचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये अर्धनग्नं अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. ज्य़ावरआ'शिषे' मे देख असं लिहिण्यात आलं आहे. याशिवाय 'राजकारणातील हि.. जाडा' अशी ओळही होर्डींगवर लिहिण्यात आली आहे. शेलार यांच्याविरोधातील शिवसेनेची ही होर्डींगबाजी सध्या या साऱ्या वादाला वेगळ्या वळणावर नेणारी ठरत आहे, हेच स्पष्ट होत आहे. 



 


आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मंबईत अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शनं केली आणि होर्डिंगही लावले. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष मुंबईच्या आणि पर्यायी राज्याच्या अनेक रस्त्यांवरही दिसू लागलां आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या एनआरसीविषयीच्या एका वक्तव्यावर शेलार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत अनेकांचाच रोष ओढावून घेतला. ज्यामुळे अनेक स्तरांतून त्यांच्यआवर निशाणा साधण्यात आल्याचं पाहायला मिळालं. कुठे शेलारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तर कुठे त्यांच्याविरोधात चप्पल मारो आंदोलनही पुकारण्यात आलं.