शिवसेना-राणे संघर्ष ! मुंबई मनपाचं पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर
शिवसेना आणि राणे वादाचान नवा अंक सुरु, नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई होणार?
मुंबई : शिवसेना आणि नारायण राणे वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक दाखल झालं आहे. (BMC Officers at Narayan Rane's Juhu banglow)
बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यानुसार आज आठ लोकांचं पथक राणे यांच्या अधीश बंगल्यावर दाखल झालं आहे.
मुंबई महापालिकेकडून (BMC Officers) नारायण राणेंच्या (Narayan Rane) जुहू येथील बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यात आलं होतं. के वेस्ट वॉर्ड कडून नारायण राणे यांना नोटीस देण्यात आली होती. 2017 मध्ये नारायण राणेंच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती.
या बंगल्याचे बांधकाम सिआरझेडचे उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती.
महापालिकेच्या पथकाला नारायण राणे यांच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.