Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे 37 आमदारांनी सध्या बंड केलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना कधीही समजून घेतल्या नाहीत, असा दावा जाहीर पत्रातून शिवसेना आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी केला होता. त्यानंतर आमदार यामिनी जाधव  (Yamini Jadahav)यांनीही पक्षातील नेत्यांबद्दल आपली खंत व्यक्त केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटातील आणखी एका आमदाराने ट्विट करत आपण हा निर्णय का घेतला याचं कारण सांगितलं आहे.  सध्या राज्यभरात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेला पाहिला मिळतोय. त्यामुळे या आमदाराने आपल्या मतदार संघातील शिवसैनिकांना आपल्या भावना समजून घेण्याचं आवाहन केलं आहे. 


दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी ट्विट करत आपल्या मतदार संघातील शिवसैनिकांना संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय,  मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.  मुळात तशी गरज ही पडणार नाही.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक! असं आमदार योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.