Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country  : देशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रियासी इथं भाविकांच्या बसवर, मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आणि त्यामागोमागच जम्मू काश्मीरमधील डोडा इथं लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून आता संतापाची लाट उसळली आहे. देशात एकिकडे नवनिर्वाचित सरकारनं कारभार सांभाळलेला असतानाच दुसरीकडे तीन दिवसांणध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यांमुळं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी बुधवारी (12 जून 2024) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशात सध्या घडणाऱ्या या घटना पाहता, पुन्हा एकदा केंद्राच्या गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या अमित शाह (Amit shah) यांच्यावर निशाणा साधला. 


'आजसुद्धा बातमी आली, की सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि जवान शहीद झाले. 370 कलम काढल्याचा डंका अमित शाह वाजवत आले पण, तेव्हापासून काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही. (Kashmiri pandit ) कश्मिरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे', असं राऊत म्हणाले. 


अमित शाह यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाचा गैरवापर केल्याचं राऊत वारंवार म्हणताना दिसले. 'आताही त्यांना पुन्हा  गृहमंत्रीपद देण्यात आलं... जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा सुरु झाला आहे. मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला. याचा अर्थ असा आहे, की अमित शाह त्यांच्या पदाचा वापर देशात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता नांदावी यासाठी करत नाहीत, तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करत आहेत हे सिद्ध झालं आहे. ते विरोधकांना संपवतायत, पण अतिरेक्यांचा खात्मा करू शकत नाहीत', असं म्हणत शाह यांच्या भूमिकेवर त्यांनी निशाणा साधला. 


हेसुद्धा वाचा : देशातील शिक्षण पद्धतीत मोठा बदल; पदवी अभ्यासक्रमात आता एका वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया


भाजप आणि शाह यांना टोला लगावत, ते भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात, आपल्या घरात घेतात पण, काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाहीत. असा गृहमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर बसवून, या देशातील असंख्य शहिदांचा अपमान केल्याचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं. 


देशाच्या कायदा, सुवव्यसस्थेला या गृहमंत्र्यांपासूनच सर्वात मोठा धोका आहे, असं म्हणाना त्यांचं फक्त आणि फक्त राजकीय हेतूला असणारं प्राधान्य पाहता या परिस्थितीचा त्यांनी आपल्या वक्तव्याला आधार दिला. अमित शाह गृहमंत्री झाल्यापासून सातत्यानं आता आणि आधीसुद्धा जम्मू काश्मीर, मणिपूरसारखे भाग अशांत राहिले आहेत, असं मला वाटतं हा मुद्दा त्यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केला. 


अमित शाह यांचा राजीनामा मागा... 


देशातील दहशतवादी कारवाया पाहता या संपूर्ण प्रकरणामध्ये (Chandrababu Naidu, Nitish Kumar) चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे, असा संतप्त सूर आळवत जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं हे पाप आहे ते, नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावरही पडलं आहे कारण, त्यांच्या पाठिंब्यावर सरकार उभं आहे. ही त्यांचीही जबाबदारी आहे, असा खोचक टोलाही राऊतांनी एनडीएतील या नेते मंडळींना लगावला.