Maharashtra Politics : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झालं आहे. अतीवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  (SSUBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज छत्रपती संभाजीनगरचा (Sambhaji Nagar) दौरा करत आहेत.  या दौऱ्यादरम्यान ते ओल्या दुष्काळाची (Drought) पाहणी करतील. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.  दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा सुरु होणार आहे. गंगापूर तालुक्यत दहेगाव आणि पेंढारी या गावात ते पाहणी करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या आधीच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केलीय , त्यातून उद्धव ठाकरे सत्ता नाट्यांतर नंतर पहिल्यांदा संभाजी नगरात येताय त्यामुळं शेतकाऱ्यांसोबत ते काय राजकीय बोलतात याकडे ही लक्ष लागलंय. दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होणार आहेत.


दरम्यान, उद्धव ठाकरे संभाजीनगरचा दौरा करण्याआधीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी रातोरात संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले.  शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा कुठे होते, तर 20 मिनिटांत काय पाहणी करणार अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. तसंच आमच्यामुळे का होईना उद्धव ठाकरे अडीच वर्षानंतर का होईना बाहेर पडले असा टोलाही सत्तार यांनी लगावला आहे. आमच्यामुळे शिवसेना रस्त्यावर उतरतेय, आंदोलन करणार म्हणतायत, चांगली गोष्ट आहे, पुतळे जाळा वाईट वाटत नाही, आम्ही लोकप्रिय आहोत, म्हणून त्यांचं पोट दुखतंय अशी टीकाही सत्तार यांनी केलीय.


मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील लाखो हेक्टर जमिनीतील पिकांचं नुकसान झालं आहे. ऐन दिवाळीत आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.