कृष्णात पाटील, मुंबई : महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना आयुक्त इकबालसिंह चहल यांनी उद्धट उत्तरे दिली असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेत नगरसेवकांशी बोलायची पद्धत नसेल तर त्यांनी महापालिकेतून जिथून आले तिथे परत जावं असं शिवसेनेने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुक्त इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील शिवसेनेने म्हटलं आहे. प्रशासकिय अधिकारी उपस्थित का नाही याचा जाब विचारला असता आयुक्त इकबालसिंग चहल यांनी शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना उद्धटपणे उत्तरं दिली. प्रभाग समिती निवडणुकीत प्रशासकिय अधिकारी वेळेवर उपस्थित राहिले नसल्यानं सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनात वाद निर्माण झाला.


उद्धट बोलणाऱ्या आयुक्तांना परत पाठवा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा वाद रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या तक्रारीनंतर आयुक्तांची बदली होते की शिवसेनेचे वरिष्ठ नेते यातून काही मार्ग काढतात हे देखील येणाऱ्या काळात पाहावं लागेल.