मुंबई : राज्याच्या राजकारणात शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष चांगलाचा पेटला आहे. कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणारच अशी भूमिका नवनीत राणा (Navneet Rana) यांनी घेतली आहे. खासदार नवनीत राणांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. तर त्यांनी येऊनच दाखवावं, असं प्रतिआव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) दिलं आहे. (Navneet Rana Vs shivsena in Mumabi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनं कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्याचा ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते मातोश्रीवर जाणार आहेत. पण त्याआधीच पोलीस त्यांना ताब्यात घेण्य़ाची शक्यता आहे. 


राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार 'फिल्डिंग' लावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिक रात्रभर खडा पहारा देणार आहेत. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली आहे. आतापासूनच शिवसैनिक तिथं जमले असून त्यांनी भजन-कीर्तन सुरू केलंय. बॅरिकेटिंग करण्यात आलं असून त्याच्या बाहेरच्या बाजुला शिवसैनिक जमले आहेत.


राणा दाम्पत्य मातोश्रीवर उद्या धडक देणार असल्यामुळे शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर रात्रभर पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षावर जाण्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. मात्र शिवसैनिकांनी घरी जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि  त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणांच्या इशारामुळे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेऊन शिवसेना नेत्यांशी चर्चा केली.


दुसरीकडे मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ शिवसैनिकांकडून हल्ला झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मुंबईत वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.