मुंबई : भाजपनं जाहीर केलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेची भूमिका आज निश्चित होण्याची शक्यता आहे. आज शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या भाजपनं दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय घेण्यासाठी शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संध्याकाळी सहा वाजता मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान केवळ दलीत मतांच्या बेगमीसाठी भाजनं दलित उमेदवार दिल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. सरसंघचालक मोहन भागवतांच्या नावाचा शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून हिंदू राष्ट्राची ओळख दाखवण्याची संधी भाजपनं गमावल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही टिका केली.


पाहा व्हिडिओ