आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा `एकटा टायगर`?
आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरु केलीय.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरु केलीय.
महाराष्ट्रात तसंच गोव्यातही शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं समजतंय. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपनं 'मिशन ३५०' ची घोषणा केल्यामुळं शिवसेनेकडूनही स्वबळाची चाचपणी सुरु झालीय.
भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींसोबत झालेले मतभेद लक्षात घेता, नाराज शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची कवायत सुरु झालीचं सांगितलं जातंय. नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा अशा गोव्यातल्या दोन्ही जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
गोव्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत शिवसेनेनं युती केली होती. आता गोवा सुरक्षा मंचनं लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला थेट सहकार्य करावं असा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला जाणार आहे आणि ते शक्य नसल्यास शिवसेनेला स्वतःचा मार्ग मोकळा असल्याचं वेलिंगकर यांना कळवलं जाणार आहे.